top of page

MadhuraWrites

प्रेमाचा स्रोत पालक


आईवडिलांशी विडिओ कॉल सुरु असतांनाच नवरा अचानक आला आणि हसला,"काय गप्पाष्टक सुरु?".आजकाल बरेच वेळेला आमचा कॉल होत असतो .मोबाईलचे काही फायदे, त्यामधील हा पण एक.


माझ्या आजेसासूबाईंना मी मागच्या महिन्यात भेटले.कामामुळे नेहमीच भेट होत नसली तरी फोन वर बोलणे होत असते.इतकं प्रेम आणि कौतुक इतका ओलावा.ही माया वेगळीच.

माझ्या नववीत वडिलांची ट्रान्सफर भरुच ला झाली.तशी BHEL मधे असल्यामुळे आम्हाला ट्रान्सफर ची सवय होती .पण तेव्हा ताईचं इंजीनियरिंग सुरु होतं त्यामुळे असं ठरलं की वडील एकटेच जातील आणि मम्मी आणि आम्ही भावंड नागपुरला राहु.मी एवढी रडली त्यादिवशी .पप्पा फार कड़क असले तरी माझा स्वभाव फ़क्त त्यांनाच समजतो असा माझा अनुभव पक्का होता .त्यानंतर चार वर्षे ते भरुच, मांगरोल ला होते .रोज कॉल करायचे .त्या एका कॉल ची आम्ही आतुरतेने वाट पहायचो .दर महिन्यात एक चक्कर असायची त्यांची नागपुरला .रिजर्वेशन कन्फर्म नसले तरी यायचे.कधी बस ,ट्रेन असा प्रवास करून ही यायचे. बोर्डाच्या परीक्षा, सि.ए.ची एंट्रस ते तीथे असतांनाच झाली.पण दोघा पालकांनी माझ्या तयारीत पूर्ण पाठींबा दिला.स्वप्न पूर्ण होतील हा विश्वास कायम दिला.

पुढे मी C.A करत असतांना कधीतरी ट्रिप ला बाहेर गेले तेव्हा एखादा पब्लिक बूथ वरुन कॉल व्हायचा .तेव्हा कसली ही चिंता सूचना कधीच नसायच्या .उलट माझा आत्मविश्वास वाढेल हाच फोकस असायचा .मुंबई ला पहिल्यांदाच इंटरव्यू साठी गेले आणि नापास झाले तेव्हा CST च्या जवळील बूथ वरुन वडिलांना फ़ोन केला आणि ढसाढसा रडले.अपयशाचा पहिला अनुभव होता तो .वडिलांचा आवाज़ ऐकताच धीर आला आणि सगळे काही ठीक आहे ही खात्री झाली .अशीच खात्री आज पण होते .


लग्न झाल्यावर नागपुर सोडावे लागले .तेव्हा एक दोन दिवस आड़ कॉल होत असे.मोबाइल होता.पण रोज फ़ोन करायची सवय नव्हती .फोटोज मेल करायचो ,मेसेज करायचो आणि दोनच मिनीटाचा कॉल .आई वडिलांचा सकारात्मक दृष्टिकोण,आनंदी स्वभाव आणि प्रत्येक बाबतीतला उत्साह मनाला उभारी देई.तेव्हा कधीही त्यांची काळजी वाटली नाही.त्यांचाच आधार वाटला .कधीतरी त्यांनाच माझ्या मदतीला यावं लागलं,पण कधीही काही त्रासाचा उल्लेख त्यांनी केला नाहीं. मागे वळून बघते तेव्हा वाटतं आपले पालक हे आयुष्याचे दोन भक्कम खांब असतात .नवरा , मुले ही चौकट पूर्ण करतात .सर्कल ऑफ़ लाइफ तसेच हे स्क्वेअर ऑफ़ लाइफ म्हंटले तरी योग्य ठरेल.


असेच वर्ष सरली .मी आई झाली .मुलगी मोठी होऊ लागली आणि पालकपण .आपले पालक वयस्कर होणार हा विचार कधी डोक्यातच नव्हता.माझी आई माझ्या मोठी आईशी (आजी) फारच जास्त कनेक्टेड होती.आजोबा नसल्यामुळे आणि पाच भावंडांमध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे असेल पण ती रोज तिच्या आईला भेटायची .एकाच गावात माहेर असल्या मुळे ते शक्य ही होतं.मोठी आई अचानक गेली आणि मला आयुष्याचा पहिला धक्का लागला .शाश्वत आयुष्य म्हणजे नेमकी काय हे समजलं .मोठी आईशी पंधरा दिवसातून एक कॉल व्हायचा .त्याची वाट ती सतत पाहत असे.तिच्याशी बोलायला किती विषय आणि किती गोष्टी असायच्या .अचानक एक दिवस ती निघून गेली आणि मग जाणवले की तिच्या प्रेमाला तिच्या आत्मीयतेला किती गृहीत धरले होते एवढी वर्ष . ती कधी आपल्यात नसेल हा विचार सुद्धा मनी आला नाही .


प्रेमाचे लोक हे मलाई पेढ्या सारखे असतात .इतके सुन्दर विरघळतात ते आयुष्यात की कधी संपले हे कळत सुद्धा नाही .मधली दोन वर्ष कोरोना ने जो तांडव केला त्याने अजूनच आयुष्याची आणि लोकांची किम्मत जाणवली.


हा क्षण तो एक खरा ,

जितके प्रेम आहे ते आजच व्यक्त करा ,

नियतीचा खेळ सारा ,

आयुष्य तर आहे एक वाहता वारा .


प्राण सोडून जातो पण प्रेम राहतेच .आठवणीतले अनुभव ह्याने त्या प्रेमाचा आभास होत राहतो .जेव्हा पासून जगण्याच्या शाश्वताची आणि प्रेमाच्या अमरतत्वाची जाणीव झाली आहे तेव्हा पासून ठरवले की जितके प्रेम काळजी वाटते ती व्यक्त करावी .आपले पालक,आपले आजी ,आजोबा हे आपले हक्काचे आणि खात्रीचे शिक्षक असतात .त्यांचा अनुभव समर्पक वाटत नसला तरी लोकांची, प्रवृत्तींची समज त्यांना असते .आपण मोठे झालो असलो तरी सगळच समजू लागले असे कधीच होत नाही . उलट आता पालकांशी फ्रूटफूल( फलदाय) अँड एनरीचड (समृद्ध) चर्चा होऊ शकते .अनुभवांची देवाणघेवाण होऊ शकते.जेव्हा त्यांना ही आपल्या कडून काही तरी शिकायला मिळते तो पाहण्याचा आनंद औरच असतो .


आता सगळ्याच मित्र मैत्रिणींचे पालक वयस्कर होत आहेत.तरी देखील बहुतेक जण स्टेशन वर, एअरपोर्ट वर आवर्जून घ्यायला सोडायला येतात.थकले असतील तरी नातवंडांचे सगळे लाड पुरवतात.त्यासाठी उन्हात चार चकरा माराव्या लागल्या तरी त्यांची हरकत नसते.आता त्यांना ही काही तरी दुखतं खुपत .रोजच काहीतरी नवीन असतं.अशावेळेला आपल्या मुलाने ,मुलीने आत्मियतेने कॉल केला ,अचानक एखादी सरप्राईज वीजीट दिली की सगळा त्रास पळून जातो.माझी आई नेहमी म्हणते की मी नागपुरला गेली की तेवढे दिवस तिची तब्येत उत्तम असते.मला खात्री आहे की बहुतेक पालकांची हीच परिस्थीती असावी .बरेच पालक टायर 2 टायर 3 शहरांमधे एकटेच राहतात.कामानिमित्त बाहेर राहणारे आपली मुलं ,वर्षातून एकदोनदा भेटणार.एकटेपणा भेडसावणारा असला तरी त्याला हे ज्येष्ठ नागरिक स्वीकारीत पुढे जातात.ज्यांना त्यांनी फुलासारखे जपले,सगळा आधार दिला त्यांच्या कडून काहीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणे ही किती सुंदर भावना आहे.इतकं निरपेक्ष प्रेमाचे स्रोत असणारे आई वडील जेव्हा थकू लागतात,जेव्हा त्यांना मानसिक सपोर्ट ची गरज असते तेव्हा त्यांना तो अवश्य द्यावा असे वाटते.

प्रेम सगळ्यांचेच असते पण ते व्यक्त करणे ही फार आवश्यक आहे.देवाची भक्ती आपण करतो,देवाजवळ दिवा उदबत्त्या लावतो मग पालकांना रोज आवर्जून कॉल करायला का बरं वेगळा एफर्ट, वेळ काढावा लागतो?दर वीकेंडला हक्काने बाहेर खाणारे फिरणारी आपली जनरेशन एखादा वीकेंड पालकांसाठी नक्की राखू शकत नाही का?जसं त्यांनी आपल्याला सगळं काही ठीक असण्याची हमी दिली तशीच आपण ही त्यांच्या साठी आहोत ही हमी आवश्यक आहे. उतार वयात आपले हे व्यक्त प्रेम त्यांची खरी ताकद आणि आनंदाचा स्त्रोत बनू शकतो असे वाटते.


Everything is changing around,

Pure love is constant and rarely found,

Give a hug and feel the warmth,

Cosy feeling is strength to move forth,

Hold hands and be together,

Pray for wellbeing and happiness of every father and mother.

11 views

Comments


Recent Posts

bottom of page